
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
संकल्प फाऊंडेशनचे शहराध्यक्ष विनोद दोंदल व सदस्य रवी ठाकूर याना सकाळी 10 वा.च्या सुमारास निलेश शंभरकर, शुभम गेडाम व नाना काळे यांचा फोन आला की महिन्याभरा पासून एक साधारण 22-23 वर्षाचा शरीराने दिव्यांग मुलगा यवतमाळ मधील आर्णी रोड वरील अभ्यंकर शाळे जवळ पाण्या पावसात उघड्या राहत आहे, आम्ही थोडी फार त्याची दिवसभर जेवण्याची सोय करतो, परंतु त्याला मदतीची आवश्यकता आहे, आपण येऊन हया मुलास कुठेतरी राहण्यासाठी सोय करून द्यावी, अशी विनंती केली, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता रवी ठाकूर व विनोद दोंदल पोहोचून त्या अपंग मुलाची चौकशी केली, त्याचे नाव व्यंकटेश तलांडे, तो दोन्ही पायाने, दोन्ही हाताने व पाठीतून अपंग होता, त्याच्या जवळ असलेल्या काही कागद पत्राचा आधारे त्याच्या आप्तजनाना (नातेवाईक) सम्पर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु खुप प्रयत्न केला नंतर शेवटी यश आले, त्या मुलाचा भाऊ शंकर तलांडे यांच्या सोबत विनोद दोंदल यांचे बोलणे झाले, त्याच्या भावाने सांगितले की बरेच दिवस आम्ही व्यंकटेशचा शोध घेतला परंतु सापडला नाही, आपण त्याला कुठे जाऊदेवु नका मी दोनतीन दिवसात पैशाची जुळवाजुळव करून येतो व माझ्या व्यंकटेश(अपंग) भावाला घेऊन जातो, कारण आम्ही खूप गरीब आहे, आमच्या जवळ सध्या या-जायची सोया नाही. हया संभाषण मुळे संकल्प फाऊंडेशने हया अपंग मुलाला त्याच्या गावी त्याच्या घरी पोहचवण्यासाठी लागलं ती मदत देण्याचे वचन दिले,त्याला तात्पुरता आधार देण्यासाठी कुठेतरी दोन तीन दिवस ठेवण्या करीत आम्ही यवतमाळ मधील एका वृद्धाश्रम गेलो परंतु तिथे फक्त साठ वर्षा वरील वृद्ध ठेवण्याची परवानगी आहे, इथे ठेवता येत नाही, त्या नंतर नंददीप फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्याशी सम्पूर्ण करून माहिती दिली संदीप शिंदे यांनी निसंकोच त्याला आपल्या बेवारस निवारा केंद्रात ठेवून घेतले त्याची सेवा करण्यास प्रारंभ केला सध्या हा अपंग मुलगा संदीप शिंदे यांच्या निवारा केंद्रात आहे, हे मदत कार्य करताना विनोद दोंदल, रवी ठाकूर, संदीप शिंदे, निलेश शंभरकर, शुभम गेडामव नाना काळे यांचे खूप सहकार्य लाभले.
