कै श्रीधरराव देशमुख विघालय शाळेच्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिम्मित रॅली संपन्न

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड


हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु ) कै, श्रीधरराव देशमुख वि़द्यालय या शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आज सकाळी ७ वाजता तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली. ‘हर घर तिरंगा’ अभियानाची व्यापक प्रमाणात जाणीव जागृती सामान्य नागरिकांमध्ये करण्यासाठी शाळेच्या वतीने ध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील विद्यार्थ्यांनी या रॅलीसाठी भारत देशाचा, क्रांतिकारकांचा व राष्ट्रध्वजाचा गौरव करणारी घोषवाक्ये तयार करून त्याचा जयजयकार रॅली दरम्यान केला. रॅली का़ढणात आले व घोषवाक्यांचा जयघोष, तिरंगा घरोघरी लावण्यासाठी केलेले आवाहन यामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. व कै.श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसम बु.येथे (75 वा अमृत महोत्सव) मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण गावात प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगी झेंडे देवुन घोषणा देण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष श्री.श्यामरावजी देशमुख साहेब यांनी ध्वजारोहण केले.मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी सर गावकरी मंडळी शिक्षक कळसे सर, जाधव सर, भावडे सर, चव्हाण सर, शिरफुले सर ,राऊतराव सर ,सुरमवाड सर, ढेमकेवाड सर, कांबळे सर ,कदम सर ,लोकरे सर मोरलवार मॅडम ,ईल्यास पठाण,बनसोडे मामा उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या उत्साह दिसुन येत होता. या कार्यक्रमाला गावातील युवक मंडळी व ज्येष्ठ मंडळीची उपस्थित होती..