
वरोरा तालुक्यातील जामगाव (बु) येथे स्वतंत्र दिनाच्या दिवशी शेतातील कामे आटोपून घरी परतताना मामा तलाव येथे बैलांना पाणी पाजण्याकरिता गेलेला आशिष चौधरी याचा बुडून मृत्यू झाला.
गावाजवळ असलेल्या मामा तलावात बैलांना पाणी पाजण्याकरिता नेले असता बैलांला सर्पद्वंश झाला त्यामुळे बैल सैरावैरा पळाला .बैलाला दोराच्या साहायाने पकडून असलेला आशिष सुद्धा बैलसोबत मामा तलावात पडला व तलावात बुडाला.घटनेची माहीती मिळताच वरोरा पोलीस प्रशासनाने पंचनामा केला. गावकऱ्यांच्या साहायाने आशिष ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तो पर्यंत आशिष चा मृत्यू झाला होता.आशिष सोबतच तलावात बुडालेल्या बैलाचा देखील तलावातच मृत्यू झाला.आशिष चे शवविच्छेदन करून शव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.आशिष ला आठ दिवसापूर्वीच बाळ झाले असू न बाळाचा चेहराही आशिष पाहू शकला नाही.युवा शेतकरी आशिष च्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
