
मा. उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्फत मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिले निवेदन
*
चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील नदी लगत असलेल्या कोलारी, बेलगाव, भालेश्वर, पिंपळगाव, अरेरनवरगाव, सोंद्री, चिखलगाव,हरदोली, लाडज ,आज दि.१९.८.२०२२ ला या गावातील शेतीची पाहणी केली असता त्यांच्या शेतीतील पीक पूर्ण पणे नष्ट होऊन तेथील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेली आहे प्रत्येक्षात ७४ चिमूर विधानभेचे समन्वयक माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर तथा माजी गट नेता डॉ. सतिशभाऊ वारजूकर, व काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी स्वतः शेतीची पाहणी केली, व शेतकऱ्यांची भेट घेतली,या शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे सदर भागातील शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेती केली आहे परंतु पूर परिस्थिती ने शेती नष्ट झाल्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोझ्यात सापडलेला आहे, शेतकऱ्यांच्या शेतीचे आपण तात्काळ,सर्व्हे करून बिजाई व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांनी निवेदना द्वारे केली या वेळी, काँग्रेस कमिटी ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती पंचायत समिती ब्रम्हपुरी नेताजी मेश्राम, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष वामनजी मीसार,सरपंच ग्रापंचायत पंचायत तोरगाव संजयजी राऊत, ग्राम पंचायत सरपंच चांदली संदीपजी बगमारे ,सरपंच ग्रापंचायत कालेता रामभाऊ पिल्लारे, ग्राम पंचायत सरपंच पिंपळगाव सुरेशजी दूनेदार,सरपंच देऊळगाव सुधीरजी पिल्लारे,उपसरपंच जगदीशजी बनकर , मोरेश्वरजी पत्रे,विनोदभाऊ बुल्ले ,मोरेश्वर कामडी, गोरक्षा शेंडे,ईश्वरभाऊ तुपट,नूतन प्रधान,रा बावणे,नरेश सुर्यवंशी,शिवदास मेश्राम, गजानन भूर्ले,गणपतजी प्रधान,गणपतजी वाघधरे, व गावकरी उपस्थित होते,
