ढाणकी येथील श्री दत्त मंदिरात गोकुळ अष्टमी मोठ्या उत्साहात साजरी


प्रतिनिधी:प्रवीण जोशी/ढाणकी

ढाणकी शहरातील दत्त मंदिरात श्री कृष्ण अष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ढाणकी येथे दरवर्षी श्री कृष्ण अष्टमी गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते त्याच अनुषंगाने अनेक भाविक भक्त योग अभ्यास केंदाचे कार्यकर्ते यांनी गावातील श्री दत्त मंदीरात श्री कृष्ण अष्टमी साजरी करण्यात आली यावेळी रुपेश कोडगिरवार आनंद येरावार गजानन चव्हाण यांनी श्री कृष्णा च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन केले उपस्थित गावकऱ्यांनी सुध्दा श्री कृष्णा च्या प्रतिमेची पुजन करून अभिवादन केले या वेळी महिला मंडळींनी विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून रंगलेल्या भक्ती मय वातावरणाला अधिकच सुबकता आणली होती ही रांगोळी सौ गौरी कोडगीरवार यांनी साकारली होती या कार्यक्रमाला अनेक भाविकासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.