आठ वर्षीय बालकाच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा द्या (वंचित बहुजन आघाडीची निवेदनाद्वारे मागणी)

ढाणकी प्रतिनिधी: (प्रवीण जोशी)

संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या जल्लोषात मश्गुलअसताना, राजस्थानच्या जालौर जिल्यातील सुराणा गावात आठ वर्षीय निरागस बालक इंद्र देवराम मेघवाल या दलित बालकाने तहान लागल्याने शाळेतील माठातील पाणी पिल्याने त्या शाळेतील जातपिसाट जातीयवादी विकृत मानसिकता असलेल्या छैल सिंह नावाच्या मुख्याध्यापकाने त्या कोवळ्या निरागस बालकाला केवळ दलित असल्याचे कारणाने मठाचे पाणी पील्याने निर्दयीपणे बेदम अमानूष मारहान केली त्या मारहाणीत त्या बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला, या हादरून टाकणाऱ्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ , ढाणकी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वंचित बहुजन आघाडी ने निषेध सभा घेऊन व आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पीडित कुटुंबाला तात्काळ एक कोटी रुपयांची मदत जाहीर करून ,पीडित कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामील करण्यात यावं, राजस्थानमध्ये दलित आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकार बरखास्त करण्यात या मागणी चे निवेदन पोलीस स्टेशन बिटरगाव चे ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्फत भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदि मुर्मू यांना देण्यात आले,या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे , ढाणकी नगरपंचायत चे नगरसेवक संबंधी गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहर प्रमुख शुभम गायकवाड, शाम राऊत, सुनील राऊत, राहुल विनकरे, विष्णू वाडेकर, आकाश गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, अनिकेत सावतकर, अभिजीत गाडेकर, रुपेश गायकवाड, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते