मुलाचा मित्राच्या मदतीने वडिलावर धारदार शस्त्राने हल्ला. वडील गंभीर जखमी.

ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी


कौटुंबिक कलहातून मुलाने त्याच्या मित्राच्या मदतीने वडिलावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना तालुक्यातील मौज घमापूर येथे घडली. विलास पांडू आडे वय पन्नास वर्ष असे जखमी झालेल्या वडीलाचे नाव असून मुलाचे नाव अनिकेत आडे त्याचा मित्र सुशील नारायण जाधव असे आरोपींची नावे आहेत.
घटनेची माहिती विलास पांडु आडे यांच्या पत्नीने 112 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून दराटी पोलिस स्टेशनला दिली. घटनास्थळी पोलीस हजर होऊन जखमी विलास आडे यांना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मुलाने वडिलावर हल्ला नेमका का केला? त्याचे अद्याप कारण कळाले नसून पुढील तपास दराटी पोलिस स्टेशन करत आहे. मुलगा अनिकेत आडे व त्याचा मित्र सुशील नारायण जाधव त्यांच्याविरुद्ध भांडवली कलम 307, 34 नुसार दराटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे. अनिकेत आडे याला न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग उमरखेड यांच्या कोर्टात पोलिसांनी हजर केली असून दुसरा आरोपी सुशील जाधव यांचा शोध घेणे सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पडावी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार भरत चपाईतकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे करत आहेत.