
नगरपंचायत ने विजबिल न भरल्याच्या कारणावरून ढाणकी शहरातील पथदिव्यांची वीज ही, महावितरण द्वारे गेल्या अनेक दिवसापासून कापल्या गेलेली आहे. सदर पथदिव्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी अशा मागणीचे निवेदन ढाणकी भाजपचे शहराध्यक्ष रोहित वर्मा यांचे नेतृत्वात ढाणकी भाजप यांनी उपकार्यकारी अभियंत्याकडे दिले आहे. विज बिल बाबतीत नगरपंचायत ला विचारणा केली असता आम्ही नगरपंचायत काळातील सर्व वीजबील सुरळीत भरलेले आहे.ग्रामपंचायत काळातील वीज बिलाची थकबाकी असल्याच्या कारणामुळे महावितरणने पथदिव्यांची वीज खंडित केली आहे असे उत्तर मिळाले.यावर नगरपंचायत ढाणकी व महावितरणची ग्राहक मंचात केस सुद्धा सुरू असल्याचे कळाले.परंतु बंद पथदिव्यांअभावी शहरामध्ये दरोडा,चोरी, अंधाराचा फायदा घेऊन महिला मुलींची छेडछाड, तसेच पावसाळा असल्याकारणामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती अशा घटनांची शक्यता नाकारता येत नसून, यावर वरिष्ठांशी चर्चा करून उपकार्यकारी अभियंता ढाणकी महावितरण यांनी लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा? आता पुढे गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी सारखे सण सुद्धा येत आहेत. याचा गांभीर्याने विचार करून शहरातील बंद पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत करून नागरिकांना अंधाराच्या विळख्यातून मुक्त करावे अशी मागणी भाजपने निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदनात बंद पथदिव्यांच्या अभावी शहरात जर काही कोणताही आणि कुठेही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार महावितरण राहील व याविरुद्ध भाजपा ढाणकी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. सदर निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी यवतमाळ, अधीक्षक अभियंता महावितरण यवतमाळ, कार्यकारी अभियंता पुसद, नगराध्यक्ष/मुख्याधिकारी ढाणकी नगरपंचायत व ठाणेदार बिटरगाव पोलीस स्टेशन यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.
यावेळी ढाणकी भाजपचे शहराध्यक्ष रोहित वर्मा, शहर सचिव वैभव कोठारी, भाजपा तालुका युवा मोर्चा सरचिटणीस जालिंदर सुरमवाड, गटनेते संतोष पुरी, नगरसेवक उमेश योगेवार, सुभाष गायकवाड, साई मंतेवाड, सुनील मांजरे, दत्ता सुरोशे, सुदर्शन देवरकर, सतीष गडदे यांसह भाजपचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
