
कृष्णा पाटील चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव.
मो नं ७७१९८६९०९१
हदगांव – तालुक्यातील कोळी येथील विविध समाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले युवा सरपंच प्रा. संजीव मुंकीदराव कदम यांना जीवनज्योत कला प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रणित उतुंग भरारी शैक्षणिक कला , समाजिक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा २०२२ या वर्षीचा महाराष्ट्र गुणवंत शिक्षक पुरस्कार परभणी येथील बी. रघुनाथ सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते किशोर महाबोले यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
सन्मान चिन्ह प्रश्स्ती पत्र मेडल शाल व श्रिफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर हदगांव विधान सभेचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी पुरस्कार प्राप्त कोळी नगरींचे युवा सरपंच प्रा. संजीव कदम यांचे दूरध्वणी द्वारे अभिनंदन केले.
यावेळी मंचावर सुप्रिसिद्ध अभिनेते किशोर महाबोले संमेलनाध्यक्ष के. बी. दडके , तर उदघाटण डॉ. विद्या चौधरी , आचार्य गोपाळ धोमणे , निवड स्मितीचे अध्यक्ष एम एम शेख , प्रतिष्ठांन चे अध्यक्ष हनुमंत सावंत , आयोजक इंजि. मैथिली दडके , रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे , कोळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील कोळीकर , कृष्णा पाटील कोळीकर , सुधोधन पाईकराव , सिव्हिल इंजि. नितेश झट्टे , व संजय ठाकरे आदी उपस्थित होते.
