माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा

लता फाळके/ हदगाव

दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकर्‍यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शवत हदगाव येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. या बंद ला पाठींबा दर्शविण्यासाठी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब, उपनगराध्यक्ष सुनील भाऊ सोनुले युवक काँग्रेसचे संदीप शिंदे, डॉ. बाभळीकर, माजी जि. प. सदस्य अनिल पाटील, नगरसेवक वसंतराव देशमुख, किशोर भोस्कर व इतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.