
तालुका प्रतिनिधी/मारेगाव:प्रफुल्ल ठाकरे
मारेगाव तालुक्यातील लोक संख्येचा पसारा लक्षात घेऊन रुग्णवाहिकेची कमतरता भासत असल्याची जाणीव, नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मारेगाव शहरातील जनहित कल्याण संघटनेला होऊन ता.१९ ऑगस्ट रोजी मार्डी चौकात जनहित कल्याण संघटनेच्या वतीने तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी रुग्ण वाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.
आदिवासी बहुल तालुका म्हणून मारेगाव तालुक्याची ओळख असुन तालुक्यात कष्टकरी मजुरांची संख्या जास्त आहे. वैद्यकीय सेवा सगळ्या घटकापर्यंत पोहचावी, वैद्यकीय सेवेअभावी रुग्णाची फरफट होऊ नये, ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे हस्ते व राकेश खुराणा, संदीप खुराणा, रवी पोटे, नगरसेवक नंदेश्वर आसूटकर, वैभव पवार, हेमंत नरांजे, अनिल गेडाम, अंकुश माफुर, रॉयल सयद, निलेश तेलंग, सचिन देवाळकर, गौरव आसेकर, प्रफुल देवाळकर, आदी जनहित कल्याण संघटनेचे पदाधिकारी तथा सभासद व शहरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
(फोटोसह)
