
आनंद निकेतन कृषि महाविद्यालय आनंदवन येथील अंतिम वर्षातील विद्यार्थीनींनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव
कार्यक्रम २०२२-२०२३ या अंतर्गत वरोरा तालुक्यातील सालोरी या गावात गाजरगवत व त्याचे परीणाम या विषयाबद्दल सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांना जागृत केले.
गाजरगवत हा एक विषारी गवत असून याचा मानव, वनस्पती व इतर जनावरांसह समस्त जैवविविधतेचे नुकसान होत आहे. यावर गाजरगवत मुक्त परिसर कार्यक्रम राबवून
गाजरगवत पासून मुक्ततेचा उपाय सांगत विद्यार्थीनींनी हा कार्यक्रम पार पाडला. हा कार्यक्रम सरस्वती विद्यालय येथे पार पाडला असून शाळेतील समस्त शिक्षक गण व वर्ग ८ ते १० च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
उपस्थित विद्यार्थीनी तनवी कोलते, चेतना खूने, आशिका मडावी, रूतुजा कोरडे, अश्विनी मोहरकर, सुजाता मुंढरे या कृषीदूतांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमासाठी आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा प्राचार्य डॉ. एस.एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर.वी. महाजन , कार्यक्रम समन्वयक डॉ.एस.एन. पंचभाई , तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. एन. पातोंड, डॉ. पी. के. आकोटकर , डॉ. एस. आर. ईमडे , विषय विशेषतज्ञ डॉ. सुशील वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.
