
कृष्णा पाटील चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव
हदगांव – तालुक्यातील तालंग
आज दिनांक 25/08/2022रोजी ग्राम पंचायत तालंग तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती सभे मध्ये गाव विकास कामे व तंटामुक्ती या विषया वर चर्चा करण्यात आली त्या सभेत गावातील नागरिकांच्या सर्वानुमते बबनराव निर्मल यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व बाजीराव गाढे सेवा सहकारी सोसायटी सदस्य यांची तंटामुक्ती उपअध्यक्ष पदी निवड करण्यात आली, समिती मध्ये सदस्य मुधळ सर, आर. बी. मिराशे साहेब,यादवराव मिराशे, रामराव पोलीस पाटील, संदीप खिराडे यांची निवड करण्यात आली या सभेस चेअरमन तथा मा. प. स. सदस्य बंडु पाटील , ग्रामसेवक जयस्वाल साहेब, प्रशासक सूर्यवंशी साहेब सर्व उपस्थित होते व बंडू पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गावातील विकासासाठी आपण सर्वजण मिळून काम करू व माझ्या परीने जो आपल्या गावासाठी विकास कामासाठी निधी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून मंजूर करून घेऊन गावातील विकास कामे केली जातील व गावातील जे तंटे आहेत गावातच मिटले पाहिजे कोणावरही गोरगरीबावर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे गावातील सर्व नागरिक एकोप्याने राहिली पाहिजे शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य तथा चेअरमन बंडू पाटील त्यांच्याकडून नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व सदस्यांचे शाल श्रीफळ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले गावकऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.