नाशिक मध्ये 28 लाख रुपयांची लाच घेताना अधिकारी रंगे हात सापडला

नाशिकच्या आदिवासी विकास कार्यालयातील बांधकाम विभागाचा अभियंता 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे. या संदर्भातील व्हिडिओ देखील सोशल माध्यमांवर पसरत आहे. अडीच करोड रुपयांच्या कामासाठी वर्क ऑर्डर काढण्यासाठी तब्बल 28 लाख रुपयांची मागणी या अधिकाऱ्याकडून करण्यात आली. दिनेश कुमार बागुल असे या अधिकाऱ्याचे नाव असून नाशिक अँटीकरप्शनचे अधिक्षक सुनील कडासने यांनी ही धाडसी कारवाई केली आहे या महिन्यात तब्बल दोन सापळ्यांमध्ये सापडलेली सर्वात मोठी रक्कम असून यशस्वीपणे नाशिक अँटी करप्शन ला सापळा रचता आला.
अशा धडक कारवायांमुळे सामान्य जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.