
.
प्रवीण जोशी, ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी परिसरातील /निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी वर्षानुवर्षे वसलेल्या काही वाडया त्यामध्ये संतोषवाडी नागेशवाडी, हिरामण नगर या गावातील राहणाऱ्या बांधवाना रानभाजी कर्टुले ठरतेय वरदान.
यवतमाळ जिल्यात सर्वात मोठी कर्टूल्याची बाजार पेठ म्हणून उमरखेड ओळखली जाते.
येथील माल हे थेट भारतात सर्वात मोठी कर्टूल्याची बाजारापेठ असलेले ठिकाण हैद्राबाद येथे दर बुधवारी निर्यात केला जातो.
जंगलामधील रान भाज्या तसेच रानफळे विकून उदरनिर्वाह करणारे या भागातील राहणाऱ्या बांधवांना आर्थिक श्रोत निर्माण झाला आहे .
रानातील चांगल्या प्रतीच्या आयुर्वेदिक शरीराला उत्तम स्वास्थ्य देणाऱ्या भाज्या व फळे नागरिकांना खायला मिळतात. या रान भाज्यांमध्ये करटुले नामक एक भाजी असून ती भाजी शरीरासाठी अत्यंत चांगली आहे.
या भाजीला कुठलीही रासायनिक फवारणी या खत वापरले जाता नाही त्यामुळे नमक दर्जाची भाजी म्हणून ओळखली जाते
नैसर्गिक रित्या पावसाळ्यात येणारी प्रमुख भाज्यांमध्ये कर्टुले अत्यंत पौष्टीक अशी मौसमी भाजी आहे तिला पाहुनी भाजी ही म्हणतात कारण की फक्त पावसाळ्यातच येते आणि वर्षभर मात्र ती गायब असते पावसाळ्यात ती खाल्ल्यानंतर संपूर्ण वर्षभराची उत्तम स्वास्थ्याचे बेगमी करून ठेवायची असते असे सांगतात.
कॅन्सर ,हृदयरोग ,मधुमेह, मुळव्याध यावर सदर भाजी लाभदायक आहे.
सदर भाजी पावसाळ्यात रानात उत्पन्न होते त्यानंतर आदिवासी बांधव सदर भाजी शहरी भागात विकतात. ती भाजी रानात मिळते मात्र काही प्रगत शेतकऱ्यांनी करटुलेची शेती ही केलेली आहे. मात्र ही भाजी वाळकेवाडी भागात रानात मिळते, खूप कष्ट घेऊन भाजी तोडून आणतात व करटोली भाजी शंभर ते दीडशे या भावात जागेवून खरेदी केली जाते . या भाजीला बाजारात प्रचंड मागणी असते एकंदरीत आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगली पौष्टीक व लाभदायी असलेली भाजी पावसाळ्यात प्रत्येकाने खावी असे येथे राहणारे बांधव सांगतात.
कारण ही भाजी खाल्ल्याने शरीर सुदृढ राहते तसेच गंभीर आजारात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सदर भाजी मदत करते. करटोलीची शेती केल्यास आदिवासी बांधवांना आणखी नफा मिळेल व आर्थिक आधार सुद्धा होईल.
