आमदार राजूभाऊ पारवे यांनी NH-353-D नागपूर – उमरेड राष्ट्रीय महामार्गावरील चांपा टोल प्लाझा येथे भेट

दिनांक 31/08/2022 रोज बुधवारला आमदार राजूभाऊ पारवे यांनी NH-353-D नागपूर – उमरेड राष्ट्रीय महामार्गावरील चांपा टोल प्लाझा येथे भेट दिली.
या टोल नाकावर स्थानिकांना रोजगार द्या तसेच चांपा टोल प्लाझा ते उमरेड हे अंतर 21.5 km आहे टोल प्लाझा पासून 20 km च्या आत राहणाऱ्या स्थानिक अव्यावसायिक वाहनांकरिता केवळ 315 रुपये या प्रमाणे दर लागू होतात या मासिक दरात उमरेडकरांना सामवून घेण्यासाठी आमदार महोद्यानी मागणी केली.
परिसरातील या रोड लगत असलेल्या बऱ्याच गावातील नागरिकांची शेती, घरे या रोड मध्ये गेले आहे त्यांच्या मुलांना अगोदर प्राधान्य द्या अशी मागणी आमदार मोहद्यानी या वेळी केली.
तसेच स्थानिक बेरोजगार यांना रोजगार टोल नाक्यावर मिळा या हेतूने काल काही स्थानिक मुलांना भेटण्याकरिता पाठवले असता त्या मुलांना ट्रेनींग करण्याकरीता स्वतःचा खर्चाने गुवाहाटीला जाव लागेल असं सांगण्यात आले. जर स्थानिक मुलांना टोल नाकावर रोजगार दिला नाही तर टोल नाका सुरु होऊ देणार नाही अशी सूचना अधिकारी यांना दिली व मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आमदार मोहद्यानी दिला असता 2 तासाचा आत त्यांच्या अधिकारी यांच्याशी चर्चा करून स्थानिकांना रोजगार देणार व उमरेडकरांना 315 रुपये या प्रमाणे दर लागू होतात या मासिक दरात उमरेडकरांना सामवून घेण्याचे कबूल केले.

या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक राजेश मदने, तसेच संबधित विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.