
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) येथील मुख्य रहदारीच्या करंजी-वाढोना रस्त्या वरील गावालगतच्या पुलाची उंची अवघी ३-४ फूट असल्याने थोडक्यात पडलेल्या पावसामुळे सुद्धा प्रत्येक वेळी पुल पाण्याखाली जातो अश्या वेळी शाळकरी विद्यार्थी ,शेतकरी,शेतमजूर,गावातील नागरिक यांना प्रत्येक पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो.
माघील कालावधीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत वाढोना ते येवती तब्बल ७-८ कि.मी अंतराच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले परंतु मुख्य पुलाचे बांधकाम वगळण्यात आले.
जि.प.कार्यालय,बांधकाम विभाग यवतमाळ यांना तक्रार देऊन सुद्धा अद्यापही निवारण झाले नाही.
अश्या परिस्थितीत राळेगाव विधानसभेचे आमदार मा.अशोक उईके सर यांनी विशेष लक्ष घालून अनेक वर्षा पासून रखडलेला पुलाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करंजी ( सो ) येथील सरपंच प्रसाद कृष्णराव ठाकरे यांनी केली आहे.
