बाभुळगाव तालुक्यातील खर्डा गवंडी येथील सरपंच व नागरिकांवर रेतीमाफीयांचा हल्ला

पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे निवेदन

सहसंपादक: रामभाऊ भोयर

बाबुळगाव तालुक्यातील खर्डा येथील सरपंच, सदस्य नरेश चौधरी व तसेच येथील नागरिक हे रेतीचे उत्खनन होत असताना अनेक अवैध रेती उत्खनन करणाऱ्या गाड्या ट्रॅक्टर गावातील रस्ते खराब करीत असताना यांनी तो प्रकार हाणुन पाडण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा आणि या सरपंच आणि नागरिकांवर रेतीमाफीयांनी गैर कायद्याची मंडळी जमवून धमक्या दिल्या तसेच या संदर्भात पोलीस स्टेशन बाबुळगाव येथे रिपोर्ट दिला असता ते रेतीमाफीया आणि पाच 25 लोक गोळा होऊन त्यांनी या सरपंच नरेश चौधरी व नागरिकांवर मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बाबुळगाव परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे असे वारंवार यवतमाळ जिल्ह्यामध्ये होत आहे याकरिता ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व नागरिकांना या गैरकायद्याच्या मंडळी कडून संरक्षण मिळावे याकरिता यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुधीर जवादे पाटील तसेच बाभुळगाव तालुका अध्यक्ष सुधीर भाऊ कडूकार ,शैलेशभाऊ गुल्हाने, प्रदीप भाऊ हजारे, शब्बीर शहा , गजानन कंठाळे, खुशाल कठाळे,संगित काळे, निलेश पाचपुते,मनोज शेळके,प्रमोद कातरकर,प्रशांत वानखेडे, राहुल वाघ,व सह्या करणारे अनेक सरपंच यावेळेस उपस्थित होते त्यांनी याबाबतची परिस्थिती माननीय पोलीस अधीक्षक यांना समजावून सांगितली व त्वरित कारवाई करण्याची विनंती केली.