
संगणक शिक्षणाच्या नावाखाली भा ज पा कार्यकर्त्याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना 30 ऑगस्ट रोजी ग.या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीली अटक करून चंद्रपूर सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
30 ऑगस्ट रोजी सकाळी पीडित मुलगी MSCIT प्रशिक्षण संस्थेत गेली असता सकाळच्या वेळेत अन्य विद्यार्थी नसल्याचा फायदा घेत तू मला आवडते असे म्हणत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला हे पाहून पीडित मुलगी तिथून बाहेर पडली .सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. आरोपी संजय वाजपेयी हा राजकिय पक्षाशी संबंधित असल्याने त्याच्या राजकीय मित्रांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला . परंतु पीडिता आपल्या भूमिकेवर ठाम राहली.1 सप्टेंबर रोजी आरोपी ची संगणक प्रशिक्षण संस्था सुटू झाल्यानंतर नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला व त्याला पोलीस ठाण्यात आल्याचे सांगण्यात येते. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसानी विनयभंगासह पोस्को अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली .शुक्रवारी बल्लारपूर पोलिसांनी आरोपीला चंद्रपूर न्यायालयात हजर केले व त्याला एमसीआर मध्ये पाठविण्याचे आदेश दिले.प्रकरणाचा तपास पी एस आय नेहा साळुंखे करीत आहे.
