पोलीस स्टेशन बिटरगाव, सर्व गणेश मंडळ, व्यापारी महासंघ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन पार पडले.

ढाणकी (प्रतीनिधी:प्रवीण जोशी)


दिनांक 6 तारखेला बिटरगाव पोलीस स्टेशन, सर्व गणेश मंडळ, व्यापारी महासंघ, यांच्या वतीने पोलीस चौकी ढाणकी येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो तितक्याच उत्कृष्ट पद्धतीने पार पडला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पाडवी व सहाय्यक पोलीस निरीक्षक भोस यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी एकूण 315 रक्तदात्यांनी रक्तदान केले एवढ्या मोठ्या प्रमाणात याआधी ढाणकी शहरात कधी ही रक्तदान झाले नव्हते यावेळी जनतेने भरपूर प्रतिसाद दिला व तरुणांचा युवकांचा मोठा सहभाग दिसून आला.
१४जून१८६८ विज्ञान अभ्यासक लँड स्टाईन यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी मानवा मधील ए गल्युटी निन च्या आधारावर रक्तगटाचा शोध लावला A,B, आणि 0 इत्यादी गटाचा शोध लावला म्हणून या शास्त्रज्ञाचा उल्लेख करावासा वाटतो.