रेती तस्कर ट्रैकरवाले जोमात,प्रशासन कोमात…
राळेगाव प्रशासनाचे डोळ्यावर कातडे का ?
शुक्रवार , शनिवार आणि रविवार त्यांचा असतो हैदोस

सहसंपादक : रामभाऊ भोयर

काही बेकायदेशीर गोष्टी आपल्या डोळ्या समोर घडत असतात.लहान मुलाना देखिल या गोष्टीची जाणिव असते,मात्र अर्थपूर्ण वाटाघाटी अधिकाऱ्या सोबत होते का ? या गोष्टीचे सोयरे- सुतक वाटत नाही असे दिसते.राळेगाव महसूल हद्दीत ट्रैक्टरवाल्याना हल्ली कोणाच्या कृपशिर्वादने सुगीचे दिवस आले असुन सुट्टीच्या दिवशी त्यांची चांदी होत असुन लॉटरी लागल्यचे चित्र दिसून येत आहे.विशेशतः रविवारी सुट्टी असल्याने. काही महसूल अधिकारी व कर्मचारी स्व्तःच्या मूळ गावी जाण्याच्या मनस्थितीत असतात.त्याचे वेध त्याना दोन दिवस आधीच लागलेले असतात.त्यामूळे शुक्रवार ते रविवार या कालावधीत रात्रीच्या वेळी रेती वाल्यांचा विशेशतः वाळू माफियंचा धुड्गूस चालू असुन हे वाळू माफिये व ट्रैक्टर वाले कोणालच भीत नाहित,असे दिसून येत आहे.तालुक्यातील रामतीर्थ , वाऱ्हां , धर्मापुर , आणि राळेगाव लागत चे नाले यातून सर्वात जास्त रेती उपसा होत असल्याचे चित्र आहे.बेसुमार रेती उपसा होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.सामन्य जनतेला या गोष्टी स्पष्ट दिसत आहेत.मात्र डोळ्यावर झापड घातलेल्या प्रशासनाला ही गोष्ट का दिसत नाही,ही गोष्ट सर्वसामन्य जनता जाणुन आहे.शहराभोवती होत असणारी अनेक बेकायदेशीर बांधकामे,त्यामूळे होणारा अति रेती उपसा,निसर्गचा व पर्यावरणाचा ढासळणारा समतोल याची जबाबदारि घेणार कोण? अशी विचारणा नागरिक खाजगीत बोलताना करत आहेत..


कापशी जुना बायपास येथे रात्र भर रेती टॅक्टर चालू असतात शुक्रवार , शनिवार आणि रविवार ला खास करून जास्त प्रमाणात चालू राहते याला जबादार महसूल विभाग आहे महसूल विभागाला विचारणा केली असता ते म्हणतात अवैध रेती चालू नाही मग कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे या संदर्भात लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांना करू


गोवर्धन वाघमारे
संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव