
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२२-२३ या कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी शृतम मिश्रा, समीक्षा धाये, तेजस्विनी इंगोले, दिव्या बर्मे, श्वेता चावट, वैदेही मुरादे, गौरव रंगे, ओम चंद्रवंशी , चिराग कडवे, किर्तिघोष राऊत यांनी रातचांदना ता.जि.यवतमाळ येथे ग्रामीण महिलांना करवंदाचा मुरब्बा , लिंबू चे सिरप यांचे उत्पादन कसे करता येते याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. याचबरोबर आवळा, बीट, केळी, टमाटर ,पपई, मोसंबी, संत्रा , जांभूळ यांपासून प्रक्रिया पदार्थ कसे करता येईल यांचे मार्गदर्शन केले . प्रत्यक्ष शेतावरील उत्पादित पिकापासून अनेक पदार्थ बनविता येते व आपल्याला पिकापासून मिळणारा नफा वाढविता येते याबद्दल माहिती दिली. यांची निर्मिती करुन आपण आर्थिक उत्पन्न वाढवू शकतो असे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील महिला उपस्थित होत्या. या प्रकल्पासाठी प्राचार्य डॉ.आर.ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही.कडु, विषयतज्ञ प्रा.डी.आर. धोत्रे मॅडम ,कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. व्ही. महानूर आदींचे मार्गदर्शन लाभले.
