विठाळा येथे सेवा दलाचे आगमन,पंधरा हजार भाविकांची गर्दी


दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण


रामनवमी निमित्य कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेश, या राज्यातून लाखोच्या संख्येने भाविक पोहरादेवी येथे दर वर्षी दाखल होतात त्या मुळे याही वर्षी वरील राज्यातील भाविक काल पासून यायला सुरुवात झाली असून दिनांक 29/3/2023 रोज बुधवारी सकाळी 10 वाजता या सेवा दळा चे आगमन विठाळा येथे होणार असून ग्रामवासियांतर्फे, सेवा दलामध्ये येणाऱ्या 12 ते 15 हजार सेवलाल भक्तांचे जेवनाची व्यवस्था विठाळा वासियांतर्फे करण्यात येणार असून सदर व्यवस्थे साठी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मागील 15 दिवसापासून लोक वर्गणी करीत आहे त्याचा लोक वर्गणीतून येणाऱ्या भाविकासाठी भव्य मंडप उभारले असून जेवण व पाण्याची व्यवस्था केली आहे, वर्गणी करिता, गावातील, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पो. पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व सर्वच प्रतिष्टीत नागरिक यांच्या नियंत्रणाखाली, गावातील सार्व जनिक दुर्गा माता मंडळ, सार्व जनिक गणेश मंडळ, सेवालाल जयंती उत्सव समिती, जय भीम जयंती उत्सव समिती, बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती, बालाजी मथुरा मंडळ, हे सर्व कार्यकर्ते येणाऱ्या भाविकांचे व्यवस्था करणार