मारोतराव वादाफळे कृषी महाविदयालय, यवतमाळ येथील विदयार्थीनी साक्षी ज्ञानेश्वर थुटे हिने रावेरी येथील शेतकऱ्यांनाकेले मार्गदर्शन, बोर्डो मिश्रण  करते पिकांवरील रोग नियंत्रण

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मारोतराव वादाफळे कृषी महाविदयालय, यवतमाळ येथील विदयार्थीनी साक्षी ज्ञानेश्वर थुटे हिने रावेरी येथील शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रणाचे प्रात्यक्षिक करून दाखवत त्याचे फायदे आणि मिश्रण बनवण्याची पद्धत  सांगितली. महाराष्ट्रात अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळझाडे या पिकांवरील बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणुन बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला जातो.हवेत जास्त प्रमाणात आद्रता असते तेव्हा बुरशीजन्य रोगांचा फळ झाडांवर होणारा प्रादुर्भाव वाढू शकतो.अशा बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बोर्डो मिश्रण अत्यंत उपयुक्त ठरते असे प्रात्यक्षिकावेळी उपस्थित शेतकरी मित्रांना सांगितले.यावेळी शेतकरी  मोहनराव हिवरे आणि श्रीमती आरती मोहनराव हिवरे हे उपस्थित होते . या प्रात्याशिकास प्राचार्या सह सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.