
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पळसकुंड येथिल शेतकरी देवीदास नागोराव गेडाम वय ४५ वर्षं रा. पळसकुंड या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून हा शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना ११ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडली आहे.सदर हा शेतकरी आपल्या शेतात बैल चारत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला तर विजेचा ही गडगडाट सुरू झाला असता त्यांच्या अंगावर वीज पडली असता हा शेतकरी ठार झाला आहे सदर या शेतकऱ्यांना करंजी येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत्यू घोषीत करण्यात आले होते सदर या घटनेचा पंचनामा पांढरकवडा पोलिस यांनी केला आहे सदर या घटनेनं पळसकुंड गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून गेडाम परिवारावर मोठा दुःखांचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व म्हातारी आई असा बराच आप्त परिवार आहे
