शेतकऱ्यांना माती परिक्षणाविषयी मार्गदर्शन

तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२२ अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुमेध सुरेशराव भोयर, चैतन्य नरसिंग राठोड,प्रणय साहेबराव मून, वैभव रवींद्र गावंडे .यांनी यावली येथे माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणसंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, रासायनिक खते देण्यापूर्वी मातीचा नमुना घ्यावा, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावं, असा सल्ला कृषिदूतांनी शेतकऱ्यांना दिला. याबरोबरच शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले. मातीमध्ये असणारे घटक, जमिनीचा सामू, मातीचा प्रकार याविषयीशेतकऱ्यांना योग्य ते माहिती दिल्यास शेतकऱ्यांच्या पैशाची सुध्दा बचत होऊन उत्पादनात भर पडेल अशी मौलिक माहिती देऊन यावली येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्हि कडू, विषयतज्ञ प्रा. आर. नागमोटे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. व्हि. महानूर यांच्या मार्गदर्शनखाली पार पडला.