
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव येथील संत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा, राळेगाव येथे शासनाच्या समग्र शिक्षा निपुन भारत अभियाना अंतर्गत इयत्ता 1 ली ते 3 री च्या माता पालक संघ सभेचे आयोजन दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले. सदर सभेमध्ये गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासन स्तरावरून विविध प्रयत्न केले जात असून यापैकीच एक म्हणजे समग्र शिक्षा निपुन भारत अभियान होय. या अभियाना अंतर्गत शाळेतील इयत्ता 1 ली ते 3 री च्या माता पालकांची सभा आयोजित करून माता पालकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच माता पालकांचे त्यांच्या विभागानुसार गट निर्माण करून गटाची रचना, कार्यपद्धती आणि कार्यसिद्धीचे उद्दिष्टे तसेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान इत्यादी विषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी गटशिक्षण संसाधन केंद्र, पंचायत समिती राळेगाव येथील प्रवीण देवकते (वि.सा. व्य.), कु. सुरेखा अड्डे (वि. सा.व्य.), विशेष शिक्षक राहुल पोटूरकर, दिपेश शेंडे, विनोद मेंढे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच या सभेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बुरले सर, इयत्ता 1ली ते 3 री चे वर्गशिक्षक श्री. वानोडे सर, श्री. रामटेके सर तसेच शाळेतील जेष्ठ शिक्षिका कु. जे. के. चाफले मॅडम यांनी अतिशय परिश्रम घेतले.
