देवानंद पाईकराव यांची वंचित बहुजन आघाडी हदगाव तालुका अध्यक्ष म्हणून फेर निवड

कृष्णा चौतमाल तालुका प्रतिनिधी


..

सविस्तर वृत्त असे की गेल्या दीड वर्षांपासून वंचित बहुजन आघाडी हदगाव तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना देवानंद पाईकराव यांनी गाव तिथे शाखा ..घर तिथे कार्यकर्ता ही मोहीम राबवून ,महाराष्ट्र राज्याचे वंचित बहुजन आघाडी चे प्रवक्ता मा.फारुक अहमद सर,राज्याचे उपाध्यक्ष ऍड गोविंद दळवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बैठका घेऊन गाव पातळीवरील कार्यकर्ते याना प्रोत्साहित करून देवानंद पाईकराव यांनी 110 गावाच्या शाखा बांधून .प्रदेश आघाडी यांच्या कडे आपला अहवाल सादर केल्या नंतर मा.फारुक अहमद सर व एड गोविंद दळवी सर यांनी .देवानंद पाईकराव यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.. त्यांच्या सोबत नवीन कार्यकारणी मध्ये एकूण 45जनाची निवड मा.रेखा ताई ठाकूर (प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य )यांच्या सहीने नेमणूक करण्यात आली…सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत नांदेड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निरंजना आवटे ताई व हदगाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ सुनीता वाठोर यांनी केले आहे…