
प्रवीण जोशी/ (ढाणकी)…….
बिटरगाव ते ढाणकी मार्गाची दुरुस्ती करुन याच मार्गावर असलेल्या नाल्यावरील पुल कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यात थोडा जरी पाऊस कोसळला तर हे नाले ओसंडून वाहू लागतात. त्यामुळे या हा उर्वरित मार्गाची दुरुस्ती करुन पुलांची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांकडून होत आहे.
बिटरगाव ते ढाणकी हा आठ ते दहा कि.मी.चा रस्ता असुन काही लांबीचा रस्त्याला डांबरीकरण झाले नसून पूर्ण मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य असल्याने आवागमन करणाऱ्या विद्यार्थी तथा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याच मार्गावर दोन नाले असुन त्यापैकी आठरी, जवळील नाल्यावर साधा व कमी उंचीचा पुल बांधलेला आहे. तसेच या पुलाची उंचीही फारच कमी आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागते. बिटरगाव येथील विद्यार्थी हे तालुक्याचे ठिकाण असलेल्या उमरखेड व काही विद्यार्थी ढाणकी येथे शिक्षणासाठी जात असतात. दुपारी पाऊस पडला तर कित्येक तास या विद्यार्थ्यांना पाणी उतरण्याची वाट पाहत बसावे लागते. रात्री किंवा पहाटेच्या सुमारास पाऊस झाल्यास त्यांचे सकाळी शाळेत जाणे होत नाही.त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तालुक्याचे बिटरगाव वरुन अंतर अंदाजे अंतर पंचवीस ते तीस किलोमीटर असुन महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उमरखेड किंवा ढाणकी येथे जावे लागते. मुख्य बाजारपेठ सुद्धा ढाणकी असल्याने शेतकरी वर्गांना सुध्दा शेतीला लागणारे बि- बियाणे, खते औषधे आणण्यासाठी ढाणकी येथे यावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात फार मोठी अडचण निर्माण होत असते. पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर वैद्यकीय उपचार करण्यासाठी अडचण निर्माण होते. बिटरगाव येथे पोलीस स्टेशन सुद्धा आहे त्यामुळे पोलिसांना सुद्धा ये जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. असे असताना सुद्धा बिटरगाव ढाणकी रस्त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. तसेच आरोग्य उपकेंद्र सुद्धा आहे. या गावाला जाण्यायेण्यासाठी योग्य रोड सुध्दा नाही. काही अंतर डांबरीकरण तर बाकी ठिकाणी खड्डेच खड्डे अशी दुरावस्था निर्माण झालेली आहे
ह्या संदर्भात वेळोवेळी गावकऱ्यांनी ह्या नाल्याला पक्के पुल नसल्याने पक्या पुलाच्या मागणीचे व रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी निवेदन सादर केले आहे. पंरतु ह्या संपुर्ण बाबिकडे आज पर्यंत शासनाने वा प्रशासनाने लक्ष पुरविले नाही. आतातरी ह्या समस्या कडे शासनाने व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विद्यार्थी तथा नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे.
(फोटोसह)
