
कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव
हदगांव – हदगांव तालुक्यातील सर्व विजधारकांना अतिरिक्त बिल आल्याने सदरील ग्राहक नागरिक त्रस्त झाले असून अगोदरच ओल्या दुष्काळामुळे प्रेशन आहेत त्यात हे जास्तीचे विजबील गरीब नागरिकाने करायचे तरी काय असा प्रश्न सध्या तालुक्यातील जनतेला पडला आहे. म्हणूनच हे जास्तीचे विजबील कमी करा अथवा आंदोलन करू असा धमकी वजा इशारा वंचित बहुजन आघाडीचे हदगांव तालुकाध्यक्ष मा. देवानंद पाईकराव कोळीकर यांनी महावितरण कंपनीला दिला आहे. यावेळी उपअभियंता साहेब यांना निवेदनात त्यांनी नमूद केले आहे.
महावितरण कंपनीच्या माध्यमातून गाव गाड्या तील सर्व समाज बांधवांना ,अतिरिक्त बिल आले आहेत,सतत पडणाऱ्या पावसाने शेतकरी हतबल झाला आहे, शेतकऱ्यावर अवलंबून असणारा सर्व घटक आज चिंतातुर आहे, एवढ्या दुष्काळी परिस्थितीत महावितरण कंपनीने वाढीव बिल देवून,सक्ती ने वसुली करण्यास सुरुवात केली आहे…वीज ग्राहक यांचा वापर बघून तातडीने वीज बिल कमी करून द्या… अन्यथा आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल त्या धरणे आंदोलनाची जबाबदारी आपल्यावर राहील असा कडक शब्दात मा. उपअभियंता साहेब यांना इशारा देण्यात आला आहे…यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी हदगाव तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्षा सौ सुनीता वाठोरे वंचित बहुजन आघाडी हदगाव चे सचिव भीमराव लोमटे,रमेश नरवाडे ,सखाराम खांडेकर उपस्थित होते..
