
गेल्या कित्येक महिन्यापासून पोलीस उपनिरीक्षक यांचे कारनामे अनेकदा समोर आले आहे. यातच गुरुवारी रात्री अंमलदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर चक्क हातच उगळला असल्याचे समोर आले असताना उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अहवाल पाठविल्यानंतर दोघांनाही निलंबित केले असल्याची माहिती मिळते आहे. एकूणच सध्या असलेले ठाणेदार वचक मिळविण्यात कमकुवत झाल्याचे यावरून स्पष्ट होते आहे.
उपविभागातील सर्वात मोठे ठाणे असलेल्या वणी पोलीस ठाण्याचा कारभार सध्या ढेपळला आहे. यापूर्वी मुकुंद कुळकर्णी, वैभव जाधव,श्याम सोनटक्के यांच्या काळात कधी गालबोट लागले नाही.मात्र सध्या कार्यरत असलेले रामकृष्ण महल्ले यांच्या काळात अनेक उलथापालथ झाली आहे. पोलीस निरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक सर्वांची मनोपल्ली सामान्य लोकांवर चालतांना दिसते आहे. अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. तपास यंत्रणा केवळ चिरीमिरी मध्ये दंग असल्याचे बोलले जाते आहे. यातच “मुंबईतून आलोय”अशी बतावणी करणाऱ्या पीएसआय ने तर अनेकांशी पंगा घेतला आहे.कर्मचारी व सामान्यांशी हुज्जत घालून खाकीचा तोरा दाखविताना सुद्धा दिसला आहे. यातच गुरुवारी रात्री अंमलदार धीरज चव्हाण याच्याशी पीएसआय शिवाजी टिपूर्णे यांनी वाद घालून धीरज च्या कानशिलात लावल्याची चर्चा शहरात जोरदार पसरली.अन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांनी तात्काळ दोघांना बोलावून बयान नोंदवून घेत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठवले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दोघांनाही तडकाफडकी निलंबित केल्याची माहिती मिळते आहे. त्यांनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तात्काळ वणीसाठी रवाना झाले. मात्र वणी ठाणेदारावर कोणती कारवाई करणार,त्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेणार,की क्लीन चिट देणार हे अवलंबून आहे. सध्यातरी वणी ठाण्याची प्रतिमा मलिन झाली असल्याचे दिसून येत आहे.
