ग्राम पंचायत निवडणूक भाजपा समर्थीत मेदवारांना विजयी करा : देवराव भोंगाळे यांचे जनतेला आवाहन

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम


सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी नेहमीच जनतेची सेवा करीत आहे.संपुर्ण पोंभुर्णा तालुका आज विकासाच्या प्रगतीपथावर आहे ,गेल्या पाच वर्षात प्रत्येक गांवात भरभरून विकासाची कामे झाली आहेत .ग्रामपंचायत निवडनुक गावाच्या विकासाकरीता महत्वपुर्ण आहे.आज गल्ली ते दिल्ली पर्यंत भाजपाचे सरकार आहे.आजचे सरकार हे शेतकरी ,शेतमजुर आणि सामान्य जनतेच आहे.सध्ःस्थितीत सरकार अनेक लोकोपयोगी निर्णय घेत आहे.अनेक योजना आज कार्यान्वित झालेल्या आहेत.सुधीरभाऊ तालुक्याच्या विकासाकरीता अहोरात्र झटत आहेत .संपुर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास हे सुधीरभाऊचे स्वप्न आहे ,ते स्वप्न पुर्ण करण्याकरिता भाजपा समर्थीत उमेदवारांना विजयी करा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. पोंभुर्णा तालुक्यात बोर्डा बोरकर आणि बोर्डा झुल्लुरवार या दोन ग्रामपंचायतीच्या निवडनुका येत्या १८ डिसेंबर ला होत आहेत.या निमित्ताने भाजपा समर्थीत उमेदवारांच्या प्रचारा करीता काॕर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी मतदारांना आवाहन करतांना त्यांनी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य राहुल संतोषवार ,माजी प.स.सभापती तथा भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम ,ऊपसभापती ज्योती बुरांडे ,नगराध्यक्षा सुलभा पिपरे ,ऊपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार ,नंदकिशोर तुम्मुलवार ,हरिपाटील ढवस ,ओमदास पाल ,रुषी कोटरंगे ,दिलीप मॕकलवार ,संजय कोडापे ,बंडु बुरांडे ,गंगाधर मडावी ,दर्शन गोरंटिवार ,राहुल पाल ,नैलेश चिंचोलकर ,वैभव पिंपळशेडे ,बंडु नैताम ,केशव गेल्कीवार ,राकेश गव्हारे आदि मान्यवर मंचावर ऊपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना अल्का आत्राम यांनी भाजपा हा सर्वसामान्य ,तळागाळातील जनतेचा पक्ष आहे.सुधीरभाऊ हे आपल्या मतदारांचे आमदार आहेत ,मंत्री आहेत .सुधीरभाऊनी गेल्या पाच वर्षात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.त्यामुळे या विकासकामाला पुन्हा गती मिळावी यांकरीता मतदारांनी भाजपा समर्थीत ऊमेदवारांनाच मतदान करावे.विचारपुर्वक मतदान करा ,मतांचा योग्य वापर करा ,विकासाला चालना देणारा फक्त भाजपा हाच एकमेव पर्याय आहे . असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रवि गेडाम तर आभारप्रदर्शन अजय म्हस्के यांनी केले. काॕर्नर सभा यशस्वी करण्यासाठी संगीता गव्हारे ,आश्वीनी कुनघाडकर ,आशिष देशट्टीवार ,पंकज नैताम ,अमोल बुरांडे ,बंडु देवगडे ,निलेश पेदोंर ,निलेश नैताम ,सुनिता वडस्कर ,निर्मला खेडेकर ,ललीरता गद्देकार ,रेखा रामटेके ,ईंदु कुभंरे ,कविता राऊत ,सुचिता नैताम ,विद्या नैताम यांनी अथक परिश्रम घेतले. काॕर्नर सभेला बोर्डा दिक्षीत आणि बोर्डा बोरकर येथील नागरीक मोठ्या संख्येनी ऊपस्थित होते.