
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालयात भारताचे हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजे दिनांक 29/8/2022 रोजी पासून लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. हे वेगवेगळे खेळ दिनांक 2/10/2022 रोजी म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापंर्यत घेण्यात आली.उर्वरित सामने वेळेअभावी 3/10/2022 रोजी घेण्यात आले.त्यामध्ये सर्व प्रथम दिनांक 29/8/2022 रोजी या खेळाचे उद्घाटन विद्यालयाचे अध्यक्ष दिलीप कोल्हे यांच्या हस्ते करून रंनिंग या खेळाला सुरुवात केली.त्यानंतर दिनांक 17/9/2022 रोजी लंगडी हा खेळ घेण्यात आला .त्यानंतर 24/9/2022 रोज शनिवारला विद्यालयाअंतर्गत व्हालीबालचे सामने घेण्यात आले. शेवटच्या टप्प्यात कब्बडी या खेळाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा संस्थेचे जेष्ठ संचालक चित्तरंजन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.त्यावेळी वर्ग 9वा ते वर्ग 10वा या संघात सामना घेण्यात आला.त्याचप्रमाणे वर्ग 11 वीच्या संघाचा सामना विजयी संघासोबत घेण्यात आला.या कब्बडी खेळाचे विजयी संघाला व सर्व वर्गाला समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे यांनी खेळाडूंना टिप्स दिल्या त्यावेळी व्यासपीठावर संचालक दिलीप देशपांडे उपस्थित होते.त्यानंतर विद्यालयाचे शिक्षक श्रावनसिंग वडते सर यांनी कब्बडी या खेळाबद्दल काही माहिती सांगितली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बोरकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिगांबर बातुलवार सर यांनी केले. या सर्व खेळांमध्ये वर्ग 5 ते वर्ग 12 च्या सर्व शिक्षकांनी आपापल्या संघाचा सराव घेऊन विद्यार्थ्यांचा खेळात सहभाग नोंदविला.या चाललेल्या खेळात विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर सर,दिगांबर बातुलवार सर,श्रावनसिंग वडते सर, रंजय चौधरी सर, राजेश भोयर सर,मोहन आत्राम सर,मोहन बोरकर सर, विशाल मस्के सर सौ.कुंदा काळे मॅडम,सौ.वंदना वाढोणकर मॅडम,स्वाती नैताम मॅडम,सौ.दिपाली कोल्हे मॅडम, वैशाली सातारकर मॅडम,अश्विनी तिजारे मॅडम,रूचिका रोहोणकर मॅडम,तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वाल्मिक कोल्हे बाबू,पवन गिरी बाबू,शुभम मेश्राम सर, बाबुलाल येसंबरे, विनोद शेलवटे हे उपस्थित होते.अशाप्रकारे संपन्न झालेल्या खेळामुळे विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी मदत झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी दिली.
