जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे राम अशोक माणिक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

.

दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पी डब्लू डी हॉल बल्लारपूर येथे जे सी आय राजुरा रॉयल्स द्वारा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील कोरपना ,राजुरा आणि जिवती तालुक्यातील 22 शिक्षकांची निवड करून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजुरा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सुब्बई येथील पदवीधर कृतिशील विषय शिक्षक राम अशोक माणिक यांची जे सी आय राजुरा रॉयल्स तर्फे निवड करण्यात आली.

राम अशोक माणिक यांचे शिक्षण एम एस सी (पर्यावरण),एम ए (इतिहास) ,एम ए समाजशास्त्र ,एम एड ,शालेय व्यवस्थापन पदविका संस्कृत परिचय पदविका , कँम्ब्रिज विद्यापीठ अंतर्गत टी के टी प्रमाणपत्र तसेच इंग्रजी विषयाचे सिसीसी प्रमाणपत्र प्राप्त आहे.मागील 8 वर्षांपासून पूर्व उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा ,नवोदय परिक्षेकरिता विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत.
कोरोणा काळात शाळा बंद असताना डिस्ट्रिक्ट लाईन स्कॉलरशिप क्लास मार्फत यु ट्यूब च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी विषयांचे शिक्षण दिले.
राम माणिक यांची जिल्ह्यात तंत्रस्नेही शिक्षक तसेच इंग्रजी विषय शिक्षक म्हणून आहे.शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन तसेच ब्रिटिश कौन्सिल मार्फत आयोजित प्राथमिक शिक्षकांच्या इंग्रजी प्रशिक्षणात मास्टर ट्रेनर म्हणून सक्रिय कार्य केले आहे.
एकीकडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना दिसत आहे .मात्र सुब्बई येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे.वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम राम माणिक करीत आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत जे सी आय रॉयल्स राजुरा तर्फे त्यांचा उत्कृष्ठ शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला.या सन्मानानंतर मित्रपरिवाराकडून त्यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.