असंसर्गजन्य रोगाविषयी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आरोग्य सेविका सौ शितल दिवेकर यांना पुरस्कार


प्रतिनिधी(प्रवीण जोशी) ,ढाणकी


दिनांक 12 तारखेला ढाणकी येथील रहिवासी असलेल्या शितल गौरव दिवेकर यांना असंसर्गजन्य रोगाविषयी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून शितल ह्या पंचायत समिती पांढरकवडा अंतर्गत असलेल्या अर्ली उपकेंद्र स्थित खैरी येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असून हे काम अत्यंत कठीण व जिकीरीचे असताना त्यांनी ऊन वारा पाऊस या कोणत्याही बाबीची तमा न बाळगता वरिष्ठांनी सांगितलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करून ही कामगिरी चौख पणे पार पाडली. त्यांना हा पुरस्कार मा. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आला. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांना मानद वैद्यकीय अधिकारी डॉ केंद्रे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मडावी यांचे मार्गदर्शन लाभले तर आपल्या यशाचे श्रेय पती गौरव दिवेकर व आई शालीनी दिवेकर यांना देतात. त्या म्हणाल्या नक्कीच मला हा जो पुरस्कार मिळाला त्यामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल.