
प्रतिनिधी(प्रवीण जोशी)
ढाणकी…
ढाणकी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे वतीने विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव निमित्याने दिनांक 16 रविवार रोजी ठीक पाच वाजता आर्य वैश्य भुवन येथून पथसंचलनाला सुरुवात झाली. सुरुवातीला सर्व स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला वंदन करून एक स्वयंसेवक सर्वांच्या अग्रस्थानी होता. दरवर्षी प्रमाणे यावर्षी विजयादशमीच्या निमित्ताने ढाणकी शहरात स्वयंम सेवक संघाच्या वतीने पथसंचलनामध्ये सर्व स्वयंमसेवक हे गणवेशात सहभागी झाले होते हे संचलन पाहण्यासाठी चौका चौकात गर्दी झाली होती.
शहरातील मुख्य हनुमान मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा मार्गाने पथसंचलन करण्यात आले महिला मंडळींनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून या पथसंचलनाचे स्वागत केले. हातात दंड योग्य नियोजन अभूतपूर्व शिस्त बघायला मिळाली. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे हा उत्सव होऊ शकला नाही पण यावर्षी हा कार्यक्रम पार पडला त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे तरुणांचा मोठा उत्साह यावेळेस दिसून येत होता.
