अखंड काळाची परंपरा असलेला खैरी येथील हरिनाम सप्ताह प्रारंभ

  राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

गेल्या कित्येक वर्षापासून कित्येक वर्षापासून अखंड काळाची परंपरा असलेल्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथील हरिनाम सप्ताहास भाऊबीजेच्या पर्वावर प्रारंभ झाला आहे.
खैरी येथे अखंड काळापासून सुरू असलेला परंतु मध्यंतरी तेरा वर्षाचा खंड पडलेला हरिनाम सप्ताह नंतर 1983 सालापासून अविरत सुरू आहे ही खैरी गावाची परंपरा आहे. अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलीच्या मूर्तीची गावात मिरवणूक काढून मोठ्या हनुमान मंदिरात माऊलीच्या मूर्तीची स्थापना केली जाते व त्याच दिवसापासून मंदिरामध्ये सात दिवस सतत 24 तास टाळ व मृदुंगांमध्ये भजन सुरू असते. कोणताही खंड न पडता टाळ
सप्त्यातील भाविक, भजनी मंडळ सतत 24 तास सात दिवस टाळ वाजवीत असतात. असा हा नित्यनियम सात दिवस सुरू असतो.
खैरी गावातील दहा ते बारा महिला व पुरुष भजनी मंडळ हे प्रत्येकी दीड ते दोन तास भजनाचे प्रहर आपसात वाटून घेतात व त्यानुसार ज्यांना जी वेळ मिळाली आहे त्या वेळेवर प्रत्येक भजनी मंडळ हजर होऊन आप आपला भजनाचा प्रकार करीत असतात. अशा भजनाच्या प्रहराद्वारे 24 तास अखंड टाळा सुरू असतो. प्रहरामध्ये नित्यनेमाने भजनी मंडळ येत असतात त्यात सर्व काम करू मजूर वर्ग असतात परंतु कोणताही थकवा न बाळगता हे सर्व रोज या सप्ताहामध्ये भजनाद्वारे आपापले कर्तव्य पार पाडतात. नंतर आठव्या दिवशी सप्ताहाची समाप्ती होऊन सप्ताह समाप्तीचे वेळी गावातील व बाहेरगावातील अनेक भजनी मंडळ सामील होऊन भजन दिंडी द्वारे ज्ञानेश्वर माऊली च्या पालखीची मिरवणूक संपूर्ण गावात काढल्या जाते व त्यासोबतच चार महिने चालणाऱ्या चतुर्मासाची अभंगाची फेरी ची समाप्ती सुद्धा याचा सप्ताहामध्ये केली जाते. व नंतर मोठ्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात खैरी व परिसरातील गावातील असंख्य लोक महाप्रसादाचा लाभ घेत असतात.