

इप्टा आणि थिएटर वर्कर्स यांच्या कडून दिनांक २ ते ५ नोव्हेंबर रोजी के. टी. एच. एम. च्या नाट्यशास्त्र विभागात चार दिवसीय “दर्शक रंगभूमी” ची कार्यशाळा घेण्यात आली. या चार दिवसीय नाट्य कार्यशाळेत नाशिक मधील नाट्यरसिक युवकांना “थिएटर ऑफ दि ऑपरेस्ड” या नाट्यप्रकाराच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांची ओळख झाली.
आदिम काळात नट आणि प्रेक्षक हि दरी नव्हती. नाटक हे लोकांनी लोकांसाठी केलेली कृती असे. ह्याच गोष्टीच्या मुळाशी जाऊन “थिएटर ऑफ दि ऑपरेस्ड” या नाट्यप्रकाराची निर्मिती झाली. ब्राझिलियन नाटककार आगस्टो बोअलने ” थिएटर ऑफ दि ऑपरेस्ड” या नाट्य प्रकाराची निर्मिती केली . ऑपरेस्ड म्हणजे शोषित अर्थातच शोषितांची हि रंगभूमी समाजातील समस्या आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणींनवर त्यांना स्वतः बोलण्याची संधी देत असते अथवा चर्चा करण्यास भाग पाडत असते. सामाजिक जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने संवादात्मक थिएटर चा हा एक प्रकार आहे. नाटक हे सामाजिकी प्रश्न उचलण्याचं प्रभावी माध्यम आहे. ते ज्या प्रेक्षकांसाठी होतं त्यांना सुद्धा यात सहभागी होता आला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण एखाद्या विषयावर नाटक करून त्याचं विश्लेषण करून त्याची चिकित्सा करून त्यावर उपाय किंवा आपले मत सांगत असतो. जेवढे व्यक्ती तेवढे उपाय शक्य आहेत. म्हणून प्रेक्षकांना आपल्या विषयावर स्वतः बोलण्याची संधी या प्रकारात मिळत असते.
पारंपरिक नाटकांप्रमाणे हे नाटक सुरळीत सुरु राहत नाही. तर यात एखादी समस्या व त्या समस्येने शोषित एक पात्र तर शोषण करणारं दुसरं पात्र हे मुख्य भूमिकेत असतात. प्रेक्षाकांना शोषणाची जाणीव होईल अश्या बिंदू वर नाटक फ्रीज होतं नंतर प्रेक्षक शोषित पात्राच्या जागी येऊन नाटक पुढे नेत असतात.
कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण म्हणजे शेवटच्या दिवशी, ५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी या रंगकर्मींनी या प्रकारचे नाट्य प्रयोग दर्षकांसमोर सादर केले .
ही कार्यशाळा थिएटर वर्कर्सच्या प्रियपाल दशांती आणि संकेत सीमा विश्वास यांनी घेतली. दोघेही नाट्य व सिने कलावंत असून आधीच ते टी वी मालिकेमधून घराघरात पोहचलेले कलाकार आहेत. तसेच या साठी इप्टा नाशिकच्या तल्हा शेख, हर्षाली देवरे, कृष्णा कांगणे, आदी यांनी विशेष साहाय्य केले . तसेच के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे तेजस बिलदिकर व इतर शिक्षकांनी या कार्यशाळेसाठी विशेष मदत घेतली . कार्यशाळेत नाशिकच्या २० युवा रंगकर्मी सहभागी होते .
कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण म्हणजे शेवटच्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी. या रंगकर्मींनी या प्रकारचे नाट्य प्रयोग सादर केले.
