

प्रतिनिधी: नितेश ताजणे
वणी :- श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांचा पंढरपुरातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गोपालपुरी येथील गोपालकृष्ण मंदिराचे विश्वस्त आनंद गुरव यांच्याकडून नुकतेच सत्कार करण्यात आला. बुधवार ९ नोव्हे. रोजी गोपालकृष्ण मंदिरात एका छोटेखानी कार्यक्रमात भोयर याना श्रीफळ व दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले.
गोपाळपुरी हे एक पवित्र तीर्थस्थान असून या ठिकाणी मंदिरातील मूर्तीचे मुख विठ्ठलाचे आहे. तर त्याच विठ्ठलाच्या हातात कृष्णाची बासरी आहे. म्हणून या मंदिराचे नाव गोपालकृष्ण मंदिर आहे. याठिकाणी भगवंत गोपाळकृष्णांनी गोपाळ काल्याची सुरवात केली होती असे सांगण्यात येते. या मंदिरात संत जनाबाईच्या अनेक वस्तू संग्रहित आहे. ज्यात संत जनाबाईला दळण दळू लागायला चक्क पांडुरंग येत असायचे ते जाते व चूल भाकरी थापायची पाटी असे विविध वस्तू दर्शनास आहे.
रुक्मिणी मातेचा माहेर विदर्भातील कोंडण्यपूर येथून त्यांच्या नंदी येथे भरायला आला होता. त्या नंदीचीमूर्ती व रुक्मिणी मातेच्या आईवडिलांची मूर्ती तसेच कृष्णचा पाळणा असे अनेक विविध संत कालीन पुरावे येथे आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आषाढीतील लाखो वारकरी भक्त्यांची वारी याच मार्गाने येत असतात. आणि देशातील कोणताही भाविक पंढरपुरात आला की तो गोपालकृष्ण मंदिरात दर्शन घ्यायला गोपाळपुरीत येथे नक्की येतो. त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानल्या जाते.
श्री गुरुदेव सेनेचे संस्थापक दिलीप भोयर गोरगरीब निराधार लोकांची मदत म्हणून करीत असलेल्या पुण्यकार्याची दखल घेऊन प्रहार संघटनेच्या सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी ताई बारंगुळे, ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर भु-वैकुंठ समितीचे अध्यक्ष जनार्दन देठे, कार्याध्यक्ष रघुनाथजी माचेवाड यांच्या उपस्थितीत मंदिराचे विश्वस्त आनंद गुरव यांनी दिलीप भोयर यांचा सत्कार केला.
