
वणी तालुक्यामध्ये २०१७ मध्ये उकणी खाण परिसरामध्ये प्रथम १ वाघ आला खाणबाधित क्षेत्रातील शेतकरी, शेतमजुरांची गाय, बैल, बकरी अशी अनेक जनावरे मारली. त्याचा वावर खाण भागामध्ये फोसोफिस झुडूप, जागो-जागी पाणी उपलब्ध झाल्यामुळे हिरवे कुरण असे थंडगार अनुकूल वातावरण व भक्ष्य खायला मिळते. त्यामुळे वाघ या परिसरामध्ये रमला आहे. परंतू आज पर्यंत खाणबाधित प्रकल्पग्रस्त पिंपळगांव, बोरगांव, जुनाड, उकणी, कोलेरा, पिंपरी, गोवारी, निळापूर, ब्राम्हणी, निलजई, बेलोरा, नायगांव बु., मुंगोली, माथोली, जुगाद, चिखली, टाकळी, येनक, शिवणी, साखरा, कोलगांव हे प्रत्यक्ष वाघाचा वावर असणारे वे. को.ली. प्रकल्पग्रस्त गावे आहेत. त्यानंतर जंगल लगत केसुर्ली, मंदर, वारगांव, चारगांव, शेवाळा कवडशी या भागातही वाघाचा वावर आहे. आतापर्यंत पाळीव व जंगली पशु जिवीत हानी झालेली असून मानवावर हल्ला झालेला नाही. अश्याही परिस्थितीत १० ते २० टक्के जमिन वै. को.ली. ने अधिग्रहन न केल्यामुळे नाईलाजाने फोसोफिस जंगल सदृश्य गावासभोवताल व येण्या-जाणान्या रस्त्यावर भागात पिंपळगांव, बोरगांव, जुनाड, उकणी, कोलेरा, पिंपरी, मुंगोली येथील परिस्थितीती आता ६ ते ७ वाघाच्या भितीमुळे जगने कठीण झाले आहे. या परिसरातील शेतकरी / शेतमजुर, विद्यार्थी, ये. को.ली. कर्मचारी, छोटे व्यावसायीक यांनी प्रवास कसा करावयाचा यामध्ये वर्धा, पैनगंगा नदीलगत शेतकरी आधीच अतीवृष्टी व महापूराने उध्दवस्त झालेले असून आता रबी हंगामातील पिके घेतांना शेतकरी / शेतमजुर यांना शेतावर जाणे अवघड झालेले आहे. शेतकऱ्यांसमोर जीवन जगण्याचे प्रश्न निर्माण झालेला आहे. यातच दिनांक १०/११/२०२२ ला अभय देऊळकर, रा. रांगणा भुरकी वय २५ वर्ष शेतकरी सायंकाळी ५.०० वा. शेतात वाघाने हल्ला करून ठार मारले. या दुर्देवी घटनेपासून तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
वे.को. ली. परिसरात नियमानुसार पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक झाडाची लागवड करणे बंधनकारक असतांना ती लावलेली दिसत नाही आणि सर्वत्र वे, को. ली. खुली जागा, रस्ता विभाग यावर फोसोफिसचे जंगल तयार झाले त्यामुळे वाघाचा अधिवास वाढला. सोबतच टिपेश्वर व ताडोबा येथील वाघांची संख्या वाढली व मध्यभागी असलेल्या वणी तालुक्यात जंगल सोडून वे.को. ली. चे मानवनिर्मित झुडपी जंगलात वाघाची संख्या या ठिकाणी पुढेही वाढणार आहे परिणाम येथील नागरीकाचे जीवन धोक्यात आहे. वे.को.ली. परिसरात व गावात अनावश्यक रस्ते व खुली जागा यावर वाढलेले फोसोफीस झुडपांचे डोजरव्दारे सफाई करुन जागा साफ करणे सोबत पोचमार्गावर वे. को. ली. कडून पथदिव्याची व्यवस्था करावी, ध्वनीक्षेपकाव्दारे वाघ बाधित क्षेत्रात नागरीकांना सुचना व जागृती करण्यात यावी. याच बरोबर वनविभागाने युध्द पातळीवर पेट्रोलींग च्या फेऱ्या वाढवाव्या. वाघ बाधित गावात वाघ व मानव संरक्षक मजुर नेमूण नागरीकांना सतर्क करावे, जंगलालगत शेतकऱ्यांना तारकंपाऊड, सोलर इ टका मशीन देऊन शेतपिक वाचविण्यात मदत करावी. मानवी जिवावर झालेल्या हल्ल्यामुळे भयभित इ आलेल्या नागरीकांना दिलासा देण्याकरीता राजस्व विभाग, वनविभाग व वे.को.ली. प्रशासन यांनी संयुक्तरित्या उपाययोजना होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुन नागरी जीवास धोका होणार नाही अशी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी विजय पिजदूरकर यांनी केली.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिजदूरकर यांच्या सह दीपक मत्ते,नीलकंठ धांडे, विकास पिदूरकर,दत्ता काकडे,दीपक पाऊनकर,पवन नागरकर, राजू वाघमारे,अतुल बोढे, संदीप नेरुरकर कुणाल परचाके आदी उपस्थित होते.
