तिरळे कुणबी परिचय मेळाव्यात 140 वर -वधूनी नोंदवला सहभाग
( परिचय पुस्तिकेचे प्रकाशन, मान्यवरं|सह समाज बांधवाचा उत्स्फूर्त प्रतिसाद )

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुका तिरळे कुणबी समाज संघटना द्वारे( दि.25) वडकी येथील कोकाटे सभागृह येथे उपवर -वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला.या वेळी उदघाट्न सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री माणिकराव ठाकरे, उदघाटक विलासराव भोयर, प्रमुख पाहुणे ऍड. प्रफुल्ल मानकर, प्रकाश मानकर, सुरेश गुडधें, जानराव पाटील केदार,उषाताई भोयर,प्रशांत तायडे,डॉ. कुणाल भोयर,प्राजक्ता प्रवीण कोकाटे, (सचिव )डॉक्टर अशोक फुटाणे (तिरळे कुणबी समाज संघटना राळेगाव अध्यक्ष)हेमंत ठाकरे, मिलिंद इंगोले शोभाताई इंगोले ज्योतीताई खैरकार आदीसह मान्यवर उपस्थित होते.या परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाज बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
उदघाट्न सोहळ्या उपरं|त परिचय मेळाव्यास सुरुवात झाली.140 वधू -वरांनी परिचय मेळाव्यास हजेरी लावून आपला परिचय दिला. उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थाना वरून बोलतांना माणिकराव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती सोबत जोड व्यवसाय करण्याच्या गरजेवर भाष्य केले. समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी सर्वतॊपरी सहकार्य करु अशी ग्वाही त्यांनी दिली. परिचय मेळावे ही काळाची गरज असून त्यातून वेळ व पैशाची बचत होते अशी भावना त्यांनी व्यक्त केली .उदघाटक विलासराव भोयर यांनी सामाजिक बांधिलकी जपणारी युवा पिढी आज पुढे यायला पाहिजे, त्या दिशेने आपण सुरुवात केली याचा आनंद व अभिमान वाटतो असे विचार मांडले. ऍड. प्रफुल्ल मानकर यांनी तिरळे कुणबी समाजाच्या प्रत्येक कार्यात सम्पूर्ण सहकार्य करु अशी ग्वाही दिली. इतरांनी देखील समयोचित विचार मांडले. तिरळे कुणबी वधू -वर परिचय मेळाव्यासाठी तन -मन -धनाने झटणारे व या मेळाव्याला आकार देणारे माजी प.स. सभापती प्रवीण कोकाटे यांचा तिरळे कुणबी समाजाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते तिरळे कुणबी समाज वधूवर -उपवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. राळेगाव तालुक्यात पहिल्यांदा तिरळे कुणबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आल्याने समाज बांधवानी समाधान व्यक्त केले. तालुक्यातील समाजबांधव भगिनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . वणी, घाटंजी, उमरखेड, पांढरकवडा या तालुक्यातील तिरळे कुणबी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास आवर्जून हजेरी लावली .कार्यक्रमाचे प्रास्तविक हेमंत ठाकरे यांनी केले.तर संचलन व आभार मनिष काळे यांनी मानले