लाखो रुपयाचे जलशुद्धीकरण यंत्र पडले धुळखात,दिड वर्षापासुन यंत्र बंद लाखो रुपये पाण्यात?

फुलसावंगी प्रतिनिधी : संजय जाधव



येथील ग्राम पंचायतने लाखो रुपये खर्च करून बसवलेले जलशुद्धीकरण यंत्र मागील दिड वर्षा पासुन धुळखात पडलेले आहे.
ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, या उद्देशाने १४ वित्त आयोगाच्या निधीतून २०१७-१८ मध्ये औरंगाबादच्या एका कंपनी कडून येथील जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले होते .या यंत्राच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरविण्याचा हेतू होता. त्या हेतूलाच आता तडा जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे बंद झाले आहे. या जलशुद्धीकरण यंत्रावर ग्राम पंचायत फुलसावंगीने केलेला लाखो रुपये खर्च पाण्यात गेला आहे.असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.जनतेच्या कराचा पैसा ग्राम पंचायत ने कसा वापरला हे आता स्पष्ट होत आहे.या जलशुद्धीकरण यंत्रावर झालेल्या खर्चाचा कोणताच उपयोग नागरिकांना होतांना दिसत नाही.
येथे लाखो रुपयाचा निधी खर्च करुन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे.तो मात्र केवळ ग्राम पंचायतीच्या उदासीन धोरणामुळे या योजनेला ग्रहण लागुन नागरिक स्वस्त शुध्द पाण्या पासुन वंचीत राहत आहेत.गोरगरिब जनतेला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं परंतु सत्तेत आल्यावर त्या आश्वासनाचा विसर सत्ताधाऱ्यांना पडल्याचे दिसून येत आहे.सर्वसामान्यांना विकत घेऊन शुद्ध पाणी पिणे न परवडणारे आहे.केवळ काही दिवसांसाठी जलशुद्धीकरण यंत्राच्या दुरूस्तीसाठी प्रयत्न करायचे व नंतर जशास तसे हा प्रकार गेल्या दिड ते दोन वर्षांपासून घडत आहे.त्यांमुळे या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
*”

तात्काळ जलशुद्धीकरण यंत्र सुरू करा… #शैलेश वानखेडे

नागरिकांना जे २० लिटर चे जार या जलशुद्धीकरण यंत्रावर पाच रुपयाला मिळत होते.तेच जार आता ईतर ठिकाणा वरुन २० रुपयात घ्यावे लागत आहे.नागरिकांना नाईलाजास्तव शुद्ध पाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहे.शासनाने बसवलेले जलशुद्धीकरण यंत्र ग्राम पंचायतने लवकर चालू करुन नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे.अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा ग्रामपंचायत ला दिलेल्या निवेदनात शैलेश मु.वानखेडे यांनी दिला आहे.