
प्रतिनिधी प्रवीण जोशी
ढाणकी
,मौजा, कृष्णापुर येथील मनोज चंद्रभान बाभळे या युवकाने अत्यंत खडतर मानली जाणारी नेट ही परीक्षा उत्तीर्ण होऊन गुनानुक्रमे देशातून 93 वा, गुनानुक्रमे पटकाविला अत्यंत कठीण असणारी ही परीक्षा काही मोजकेच विद्यार्थी यात उत्तीर्ण होतात त्यातील मनोज चंद्रभान बाभळे, कृष्णापुर हा होय. कर्मामध्ये सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते हे त्याच्या कठीण असलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे सिद्ध होते. ग्रामीण भागामध्ये सुद्धा गुणवत्ता ठासून भरलेली आहे हे त्याने या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे दिसते.
मनोज ने पदवीपर्यंतचे शिक्षण हे उमरखेड येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय येथे घेतले तर पुढील एम एस सी झूलॉजी हे शिक्षण श्री शिवाजी सायन्स महाविद्यालय अमरावती येथे घेतले व पुढील उच्च शिक्षण पुणे येथे घेतले. व नेट ही परीक्षा उत्तीर्ण झाला. प्राध्यापक व डॉक्टर साठी सुद्धा पात्र ठरला आहे त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे विशेष म्हणजे कृष्णापुर सारख्या ग्रामीण भागातून येऊन हे यश संपादन केल्यामुळे नक्कीच इतर युवकांना सुद्धा प्रेरणा मिळेल एवढे नक्की या यशाचे श्रेय तो आई-वडील व प्रा दादासाहेब सोंडगे, प्रा लालजी कनोजिया,प्रा डॉ संदीप चेंडे, प्रा डॉ कैलास चौधरी प्रा डॉ नितीन इंगळे प्रा डॉ धनराज तायडे, प्रा डॉ दिनेश दाभाडकर प्रा, कल्याणकर व सर्व मार्गदर्शक गुरुजनांना आपल्या यशाचे श्रेय देतो.
