महाराष्ट्रात राजकीय भूकंप:अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री,शिंदे गटाला धक्का

बाळासाहेब ठाकरे यांनी कष्टाने बनविलेल्या शिवसेनेत बंड पुकारून भा ज पा ला समर्थनात घेत सरकार बनवत महाविकास आघाडी चे सरकार पाडले .राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 पैकी 30 आमदार सोबत घेत अजित पवार शिंदे :फडणवीस सरकार मध्ये सामील झाले आहे.
राजभावणावर शपथविधीची तयारी सुरू आहे.अजित पवार सहित राष्ट्रवादी चे 9 आमदार मंत्रिमंडळात सामील होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांनी अजित पवार यांची मानभरणी करण्याचा प्रयत्न केला परंतु अजित पवार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.शेवटी त्यांनी शिंदे सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.