राळेगाव येथे “वेध ग्राम समृद्धी” अंतर्गत शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

वेद ग्राम समृद्धी”अंतर्गत दि. ८-१२-२०२२ रोजी गुरुवार दुपारी १० ते ४ वाजता वसंत जिनिंग भाऊसाहेब कोल्हे सभागृह राळेगाव जि. यवतमाळ येथे “किफायतशीर पाण्याच्या वापरातून श्रीमंती, लखपती शेतकरी, एकात्मिक सेंद्रिय शेती व थेट विक्री व्यवस्थापन” या विषयावर अभिनव फार्मर्स क्लब पुणे संस्थापक अध्यक्ष तथा नामवंत कृषीतज्ञ मा.श्री. ज्ञानेश्वर बोडके मु. माना बोडखेवाडी ता. मुळशी जी .पुणे यांचे विशाल मार्गदर्शनपर “वेद ग्राम समृद्धी शेतकऱ्यांची कार्यशाळा” शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केली आहे.