रामगंगा नदी परिक्रमेत सहभागी होण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

      

“रावेरी” हे गाव यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुक्यात आहे. या गावात भारतातील एकमेव सीता मंदिर आहे. लव कुश यांचा जन्म झाल्यावर प्रभू श्रीराम यांनी जो अश्व मेघ यज्ञ करण्याचे योजीले त्यावेळी त्या अश्वमेघ यज्ञाच्या घोड्याला लव कुश यांनी याच ठिकाणी अडविले होते. प्रभू श्रीराम यांचे परमभक्त हनुमान जेव्हा अश्वमेघ घोडा सोडवण्यासाठी गेले तेव्हा लव कुश यांनी हनुमान यांना वेलीनी बांधून ठेवले होते तेच हे ठिकाण आहे. या सीता मंदिराचा जीर्णोद्धार शेतकरी संघटनेचे पंचप्राण मा.शरद जोशी यांनी केला आहे. सीता मंदिराला लागून रामगंगा नदी वाहते तिला रामायण काळात “तमसा” या नावाने ओळखले जाते. रामगंगा नदीची परिक्रमा दिनांक 12 डिसेंबर 2022 ला करण्याचे ठरविले आहे. दोन दिवस रामगंगा नदी परिक्रमा असेल. नर्मदा परिक्रमा एवढेच महत्त्व रामगंगा नदी परिक्रमेला आहे. त्यामुळे रावेरी येथील रामगंगा नदी परिक्रमेत शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे सीता मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत बाळासाहेब देशमुख यांनी केले आहे.

🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

निमंत्रक,
श्री.चंद्रकांत बाळासाहेब देशमुख.
अध्यक्ष- सीता मंदिर देवस्थान रावेरी.
मो.-70282 98865