
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील काही परिसरात दिं.१६ मे २०२५ रोज शुक्रवारला सायंकाळी आलेल्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यसह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतात काढणीस आलेले मूंग तीळ आधी पीक भिजल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच काही गावात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने घरावरील टिनाही उडल्या आहे. तसेच उंदरी या गावातील एका शेतकऱ्यांच्या शेतात बाधून असलेल्या बैलावर झाड पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी तीळ व मुंग पिकाच्या कापणीला सुरुवात केली असून शेतात कापून ठेवलेले मूंग व तीळ शेतात सूकण्यासाठी पसरून ठेवले होते मात्र १६ मे ला आलेल्या सायंकाळी च्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची पिके ओली झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
वादळी वाऱ्याने झाकून ठेवलेले पीकही झाले ओले
शेतात कापून ठेवलेले पिकांवरील ताडपत्र्या वादळी वाऱ्यामुळे उडल्याने पिकांमध्ये पाणी घुसल्याने पिकांची पोत खराब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खरीप हंगामातील अस्मानी सुलतानी संकटाने हैराण झालेले शेतकरी उन्हाळी पिकांकडे वळले असून .खरीप हंगामात उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने झालेला खर्च या रब्बी हंगामातून तरी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली आहे परंतु आठ दिवसापासून असलेल्या ढगाळी वातावरणामुळे व अदामदात पडणाऱ्या पावसामुळे उन्हाळी पिकाचे पिकाचे नुकसान झाले आहे तरी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे
