
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राळेगाव चे वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी यात सहभाग घेतला.
ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे रुग्णांना ब्लॅंकेट वितरण, फळवाटप करण्यात आले. शिवतीर्थ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा जाणते राजे शरदचंद्रजी पवार यांच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील योगदाना बाबत कार्यकर्त्यांनी स्मरण करून त्यांना उदंड दीर्घायुष्य मिळावे अशी कामना केली.
आज कृषी क्षेत्रात अत्यंत कठीण परिस्थिती असून राज्य व केंद्र शासनाचे या कडे दुर्लक्ष आहे. आज देशाला दिशा देणाऱ्या पवार साहेबं|सारख्या व्यक्तिमत्व|ची सत्तेच्या केंद्रस्थानी गरज असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शशिकांत उर्फ बाळू धुमाळ, शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे, ज्येष्ठ नेते नामदेवराव गवारकर, सेवानिवृत्त नायब तहसिलदार विलास दुधपोळे , सेवादल तालुका अध्यक्ष गिरीधर ससनकर सर,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष मुर्तुजा बब्बर, युवक तालुका अध्यक्ष प्रसाद ठाकरे, युवक शहर अध्यक्ष पराग मानकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप कन्नाके, विद्यार्थी शहर अध्यक्ष सौरभ पारीसे, किशोर नाखले, आकाश कुळसंगे, उमेश मेश्राम, संजय सातपुते
आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
