सामाजिक मुल्यशिक्षणाचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणजे कर्मयोगी गाडगेबाबा:दिपाली कोल्हे यांचे प्रतिपादन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 20/12/2022 रोजी कर्मयोगी गाडगेबाबा यांची पुण्यतिथी वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेचा परिसर स्वच्छ करून व भाषणातून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात सुरवातीला या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेंकर, प्रमुख पाहुणे सहायक शिक्षक दिगांबर बातुलवार यांना स्थानापन्न केल्यानंतर पाहुण्यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन केले.पुजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पाहुण्यांचा स्वागत समारंभ आटोपला.या नंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग सहावीच्या वर्गशिक्षिका दिपाली वाल्मिक कोल्हे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.बोलतांना म्हणाल्या की* सामाजिक मुल्यशिक्षणाचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणजे कर्मयोगी गाडगेबाबा * असल्याचे सांगून प्रास्ताविक आटोपते घेतले.यानंतर विद्यार्थी वक्ते भाग्यश्री राऊत,माहेश्वरी मरस्कोल्हे, संदेश सुर्यवंशी, भुमिका येरेकार,गायत्री तांगडे, जान्हवी पावले यांनी गाडगेबाबांच्या कार्यावर प्रकाश टाकला.सोबतच काही विद्यार्थ्यांनी गीतगायन करून उपस्थितांची मने जिंकली.त्यानंतर गाडगेबाबांच्या रूपात वेशभूषा करणाऱ्या वैभव मडावी,मनदीप सिडाम,अंश धुडसे,नयन पेंदे, सानिया पत्रकार, वैष्णवी डंभारे,सुजल येरेकार,वंश लटारे,हर्ष कुटे,साहिल घोडाम या विद्यार्थ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आकर्षित केले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहायक शिक्षक दिगांबर बातुलवार यांनी गाडगेबाबाबद्धल सविस्तर मार्गदर्शन केले.त्यांनी गोपाला गोपाला हे गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यानंतर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.त्यामध्ये बारा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यातून परीक्षकांच्या हस्ते तीन विजेते निवडून त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.या कार्यक्रमात सानिया पत्रकार या विद्यार्थ्यांनीनी वेशभूषेतून उपस्थित मान्यवर, उपस्थित मंडळींची मने जिंकली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग सहावीची विद्यार्थींनी ईश्वरी सचिन राडे व जान्हवी पावले यांनी इंग्रजी भाषेतून सुंदररित्या केले तर आभारप्रदर्शन नैतिक विरूळकर या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक श्रावनसिंग वडते,रंजय चौधरी, राजेश भोयर,मोहन आत्राम,मोहन बोरकर, विशाल मस्के,शुभम मेश्राम,वाल्मिक कोल्हे,पवन गिरी, वंदना वाढोणकर,स्वाती नैताम, वैशाली सातारकर, अश्विनी तिजारे,रूचिका रोहणकर, बाबूलाल येसंबरे, विनोद शेलवटे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्गशिक्षिका दिपाली कोल्हे यांनी अथक परिश्रम घेतले.