सोनामाता हायस्कूल चहांद येथे नशामुक्त भारत अभियान प्रभात फेरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

   

दि. ३०/१२/२०२२ रोजी सोनामाता हायस्कूल चहांद येथे नशामुक्त भारत अभियान फेरी काढण्यात आली . या प्रभात फेरी मध्ये विद्यार्थी / तरुण पीढ़ी हे अंमली पदार्थांच्या आहारी जात आसुन येणाऱ्या नव वर्षात नवीन वर्ष धुंदित नव्हे तर शुद्धित साजरे करा. असा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे दुष्परिणामा बाबत जनजागृति करण्यात आली विद्यार्थ्यानी व्यसनमुक्तिचे पोस्टर लाऊन विविध नारे देत व घोषणा देत फेरी कढ़न्यात आली त्यांनतर शाळेत प्रबोधन पर कार्यक्रम व आयोजन करण्यांत आले. त्यावेळीे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल धोबे तसेच चिव्हाने सर,शिवनकर सर,सावंत सर, काबळे सर, दांडेकर सर, तसेच शिक्षकेत्यर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.